Ayurvedic Kadha : इम्युनिटी वाढवायची आहे? तर ‘हा’ आयुर्वेदिक काढा प्या; संसर्गापासून होईल रक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा दिवसांत संसर्गजन्य आजरांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. खासकरून सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास फार जाणवतो. त्यामुळे अशा काळात आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणे फार गरजेचे असते. पण बिघडती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत होते आणि परिणामी आपण अशा व्हायरल इन्फेक्शनला बळी पडतो. पण या पावसाळ्यात असं अजिबात होणार नाही.

कारण, आज आम्ही तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत करेल अशा आयुर्वेदिक काढ्याची (Ayurvedic Kadha) माहिती देणार आहोत. जो घरच्या घरी बनवता येतो. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार कष्टसुद्धा घ्यावे लागत नाहीत. चला तर हा आरोग्यवर्धक आयुर्वेदिक काढा बनवायचा कसा? ते जाणून घेऊया.

काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ताजे आले – एक मोठा तुकडा (किसलेले)
  • गुळ – एक छोटा खडा
  • काळीमिरी – ४ ते ५
  • दालचीनी – एक छोटा तुकडा
  • लवंग – २ ते ३
  • ओवा – चिमूटभर
  • हळद – चिमूटभर
  • हिरवी वेलची – १ किंवा २

‘असा’ बनवा आयुर्वेदिक काढा (Ayurvedic Kadha)

हा आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात १ ग्लास पाणी घ्यायचे आहे. यामध्ये, किसलेले आले, लवंग, गूळ, काळी मिरी, वेलची आणि हळद घालून पाणी उकळायला ठेवा. (Ayurvedic Kadha) आता हे पाणी पूर्ण काळ्या रंगाचे दिसेल. त्यानंतर पाणी अर्ध्यावर आले की, गॅस बंद करा. या मिश्रणात गुळाचा खडा घाला आणि तयार काढा गाळून घ्या. हलका कोमट असताना हा काढा प्या.

फायदे

घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा हा काढा अत्यंत आरोग्यदायी आहे. या काढ्यामध्ये वापरण्यात आलेले जवळपास सगळे घटक हे स्वभावाने उष्ण असतात. यातील प्रत्येक पदार्थ त्याच्या आयुर्वेदीक गुणांमुळे तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी सहाय्यक आहे. (Ayurvedic Kadha) हा काढा प्यायल्याने सर्दी, खोकलासारख्या संसर्गांपासून तुमचा बचाव होतो. या काढ्यामुळे घशातील संसर्गापासून देखील सुटका मिळते. त्यामुळे हा काढा पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत लाभदायी ठरतो.