Ayurvedic Remedies for Snoring | अनेक लोक हे रात्री झोपल्यानंतर जोर जोरात घोरत असतात. त्या व्यक्तीला काहीच माहिती नसते. परंतु त्याच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीला मात्र या घोरण्याचा खूप जास्त त्रास होत असतो. परंतु हे घोरणे त्या व्यक्तीचे आरोग्यासाठी देखील चांगले नसते. अनेक वेळा आपण असा विचार करतो की, या घोरण्याला 9Ayurvedic Remedies for Snoring) काही उपाय असता, तर किती बरं झालं असतं? परंतु आज आम्ही तुम्हाला या घोरण्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या पासून तुमचे रात्रीचे घोरणे बंद कराल.
घोरण्याच्या समस्येचे कारण | Ayurvedic Remedies for Snoring
घोरण्याचा समस्या मागे अनेक कारणं आहेत. यामध्ये जे लोक जास्त लठ्ठ असतात ते लोक रात्रीचे घोरतात. त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे देखील घोरतात तसेच ज्या लोकांना सर्दी होते त्यांना देखील हा त्रास स्यो. तसेच जे लोक धुम्रपान करतात त्यांना देखील ही समस्या असते. तसेच योग्य ऑक्सिजनछा जर पुरवठा होत नसेल तरी देखील घोरण्याची समस्या निर्माण होते.
घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी टिप्स
झोपण्याची स्थिती बदला
जेव्हा तुम्ही पाठच्या ऐवजी पोटावर झोपता. त्यावेळी तुम्हाला श्वास घेणे सोपे जाते. म्हणजे तुम्ही पोटावर झोपला, तर घोरण्याची समस्या बंद होऊ शकते.
जीवनशैलीत बदल करणे
घोरण्याची समस्या दूर करायची असेल, तर तुम्हाला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमची श्वास घेण्याची क्षमता देखील वाढते. तसेच अल्कोहोल आणि धुम्रपान सेवन बंद केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्या निर्माण होणार नाही. झोपण्यापूर्वी तुम्ही जास्त जड पदार्थ खाऊ नका. तसेच तुम्ही झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ देखील करू शकता. यामुळे घोरण्याची समस्या बंद होईल. तसेच अनेक लोकांना झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय अत्यंत चुकीची आहे.
घोरण्यावर घरगुती उपाय
पुदिना | Ayurvedic Remedies for Snoring
जर तुम्ही कोमट पाण्यात पेपर मेंट ऑइल घालून गुळण्या केल्या तर घोरण्याची समस्या देखील दूर होऊ शकते. तसेच तुम्ही पायात पाण्यात पुदिन्याची पाने उकळून घेऊन जर ते पाणी पिले तरी देखील घोरण्याची समस्या हळूहळू दूर होते.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल जर तुम्ही नाकात टाकले तर श्वास घेण्याच्या त्रासापासून मुक्तता होते. तसेच तुम्हाला चांगली झोप देखील लागेल. तुम्ही जर रात्री नाकात झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकले तर घोरण्याची समस्या हळूहळू दूर होईल.
देशी तूप
तुम्ही जर रात्री झोपताना देशी तूप थोडेसे गरम करून त्याचे दोन-तीन थेंब नाकात टाकले, तरी देखील घोरण्याची समस्या कमी होते. आणि तुम्हाला रात्रीची चांगली झोप देखील लागते.