हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करत ७० वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या वृद्धांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Card) लाभ मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे. या योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो. यासाठी त्यांना नवीन आयुष्मान कार्ड दिले जाईल. ते कार्ड तुम्ही घरबसल्या सुद्धा अगदी आरामात काढू शकता. त्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे ते खाली स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात….
आयुष्यमान भारत कार्ड साठी अर्ज कसा करावा – Ayushman Bharat Card
सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरुन आयुष्मान ॲप डाउनलोड करा.
यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा.
लॉगिन केल्यानंतर, त्यात तुमची पात्रता तपासा.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या कोणत्याही उत्पन्न गटातील लोक यासाठी पात्र आहेत.
त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार ई-केवायसी करावे लागेल.
आता फोटो अपलोड करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करु शकता.
दरम्यान, मोदी सरकारने 2017 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरु केली होती. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे, जी सध्या देशातील सर्वात गरीब 40 टक्के लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करते. आता मोदी सरकारने या योजनेत आणखी बदल करत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या व्यक्तींनाही आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यास परवानगी दिली आहे.
सरकारने सांगितल्यानुसार, आयुष्मान भारत (Ayushman Bharat Card) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा समावेश केला जाईल. यामुळे जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल आणि ६ कोटी वृद्ध नागरिकांना ५ लाखांपर्यंत फ्री उपचार मिळेल. यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. जी कुटुंबे सध्या आयुष्मान भारत योजनेत नाहीत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल आणि त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे शेयर्ड कव्हर मिळेल.