Ayushman Bharat Yojana | आयुष्मान भारत योजनेचा विस्तार; वृद्धांचा समावेश होऊन ‘या’ आजारांचा होणार उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ayushman Bharat Yojana | सरकार हे जनतेच्या प्रत्येक समस्येचा विचार करून त्यासाठी विविध योजना तसेच उपक्रम राबवत असतात. अनेक सामान्य तसेच अत्यल्प गटातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा पुरवठा होत नाही. आणि तोच करण्यासाठी आता केंद्र सरकारने पंतप्रधान आयुष्मान भारत योजना आणली होती. आणि त्या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आणि सरकारी याबद्दलच घोषणा देखील करणार आहे. या योजनेत सध्या काही निवडक आजारांवर उपचार करता येतो. परंतु आता या योजनेमध्ये काही असाध्य आणि इतर आजारांचा देखील समावेश होणार आहे.अल्झाईमर डिमेशिया तसेच इतर आजारांवर देखील या योजनेअंतर्गत खर्च करण्यात येणार आहे. सरकारने याबाबत अजून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. परंतु लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांना देखील या योजनेमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या योजनेचा विस्ताराचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

माध्यमातून वृत्तानुसार आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने या योजनेतील बदल करण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे अजून इतर व्याधी आजारांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्यात येणार आहे. वयोमानानुसार येणाऱ्या आजारपणांचा देखील समावेश असणार आहे. वय झाल्यानंतर लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर त्यांना योग्य उपचार घेता येत नाही. परंतु आता या आयुष्मान भारत योजनेमध्ये (Ayushman Bharat Yojana) या आजारांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. या योजनेत सध्या 25 आजारांचा समावेश आहे.

या योजनेत आता वयोवृद्धांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. वाढत्या वयानुसार येणाऱ्या आजारांवर उपचार दिले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात वयोवृद्धांच्या या आजारांवर जास्त लक्ष केंद्रित करता येणार आहेत. या योजनेत अशा अनेक आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे निदान झाल्यावर आता या आजारांवर त्वरित उपचार मिळेल. यामध्ये स्ट्रोक हार्ड फेलियर, कॅन्सर, अल्झायमर यांसारख्या रोगांचा समावेश करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे आता आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) हेल्थ कार्ड 2025 पासून गुगल वॉलेटवर देखील मिळणार आहे. या योजनेचे फायदे डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत ही योजना चालू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गुगल सोबत या कामासाठी हात मिळवणी केलेली आहे.