टीम हॅलो महाराष्ट्र । हरियाणामधील अंबाला शहरातील रस्त्यावर मागील अडीच वर्षांपासून भीक मागणारा तरुण कोट्यवधींचा मालक असल्याचे उघड झाले आहे. मात्र त्याच्या भीक मागण्यामागचे कारण जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हालं.
भीक मागणाऱ्या या तरुणाचे धनंजय सिंह असं आहे. मागील अडीच वर्षांपासून धर्मेंद्र नावाने मागू मिळवलेल्या सर्व पैसा तो दारुवर उडवायचा. अंबाला शहरातील गीता गोपाल संस्थेच्या एका स्वयंसेवकाला धर्मेंद्र रस्त्याच्याकडेला जखमी अवस्थेत अढळून आला. हा स्वयंसेवक त्याला संस्थेशी संबंधित रुग्णालयात घेऊन गेला. तेथे उपचार केले. त्यानंतर संस्थेमध्ये काम करणाऱ्या साहिल यांनी धर्मेंद्रला त्याच्या घरच्यांबद्दल माहिती विचारली असता त्याने त्याला पाठ असणारा एक फोन नंबर सांगितला. दरम्यान हा नंबर धनंजयचे नातेवाईक शिशुपाल यांचा असल्याचे कळले. त्यांच्याशी धनंजयबाबत चौकशी केल्यानंतर तो कोट्यावधीचा मालक असल्याची माहिती संस्थेला मिळाली.
धनंजयच्या भीक माण्यामागचे नेमकं कारण काय..
धनंजयचे वडील हो कोलकात्यामधील एका बड्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत. धनंजयला दोन बहिणी आहेत. तो स्वत: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र वाईट संगतीमुळे त्याला दारुबरोबरच अंमली पदार्थांचे व्यसन लागले. त्यामुळेच तो घरातून पळून गेला. आपली ओळख कोणाला पटू नये म्हणून तो मागील अडीच वर्षांपासून नाव बदलून भीक मागत असे. तो अंबालामधील जुन्या धान्य बाजाराजवळच्या रस्त्यावर बसून भीक मागायचा आणि मिळालेल्या पैशांमधून दारु पिऊन फुटपाथवर पडून असायचा.
..आणि धनंजय आपल्या घरी परतला
धनंजय हा मुळचा उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथील आहे. धनंजय सापडल्याची माहिती त्याची बहीण नेहा सिंह हिला देण्यात आली तेव्हा ती स्वत: त्याला घेऊन जाण्यासाठी अंबालामध्ये आली. “धनंजयचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून तो मागील अडीच वर्षांपासून बेपत्ता होता. त्याला वाईट मित्रांची संगत लाभल्याने तो नशा करु लागला. त्याच नादात त्याने घर सोडले. आम्ही मागील दोन वर्षांपासून त्याला शोधत होतो,” अशी माहिती नेहाने दिली. “धनंजय व्यवसानामुळे आमच्यापासून दुरावला होता. मात्र आता त्याला नवे आयुष्य मिळाले आहे,” असेही नेहा म्हणाली.