समाजात सत्यशोधक विचार रुजवणे गरजेचे आहे – बाबा आढाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे फुले-आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. महात्मा सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पुजन वक्तेंच्या हस्ते केले. नंतर अखंड वाचनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते रा. ना. प्रतिष्ठानचे रमेश चव्हाण, व अध्यक्षस्थानी महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव होते.

फुले आंबेडकर आयोजित व्याख्यानमालेत सत्यशोधक चळवळीची वाटचाल या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते चव्हाण म्हणाले, महात्मा फुले एक आश्चर्य आहेत. त्याच्या विचारात, आचारातील एक वाक्यता हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांचे आचार आणि विचार हे एक मिळतेजुळते आहे, फुले यांचे सामाजिक तत्वज्ञान, व लोकशाही पद्धतीने सत्यशोधक समाजाची स्थापना करून उद्दिष्टे ठरवली गेली. सत्यशोधक समाज अनेक माणसाला माहीत नसल्याने ते माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे, खरा सत्यशोधक आपल्यामध्येच आहे, यासाठी अनेक चळवळींनी एकत्र येणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले.

डाॅ.बाबा आढाव म्हणाले, सत्यशोधक विचारांचा आग्रह करणे गरजेचे आहे, तेव्हाच संस्कार लोकांपर्यंत जाईल, माणूस म्हणून जगा हा मानवमुक्तीचा लढा आहे असे बाबा आढाव आपल्या भाषणात म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मेरगु, तर आभार अक्षय राऊत यांनी केले. यावेळी चळवळीतील आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment