भोंदूबाबाचा एकाच कुटुंबातील ४ महिलांवर लैगिक अत्याचार; आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे दिले होते अमिष

नागपूर । एका भोंदूबाबानं आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली 4 महिलांवर लैगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. पीडित मुलीनं तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोंदूबाबाला अटक केली असून अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दुलेवाले बाबा नावाने हा मांत्रिक वावरत असून याच नाव धर्मेंद्र निनावे असं आहे. हा बाबा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. मुलीचे वडील आर्थिक अडचणीत आहेत ही गोष्ट या बाबा ने हेरली. बाबानं संबंधित व्यक्तीला अविवाहित मुलीच्या हाताने 21 वेळा पूजा केल्यास तुझ्यावरची भूत बाधा टाळू शकते असं सांगत जाळ्यात ओढलं. आर्थिक अडचणीतून बाहेर निघता येईल या आशेने तो तयार झाला आणि मग बाबाचा सगळं पराक्रम सुरू झाला.

दुलेवाले बाबाने संबंधित व्यक्तीची मुलगी ,आई आजी आणि मामीला वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही तर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल अशी भीती त्याने प्रत्येकाला दाखवत त्यांच्यावर अत्याचार केले. प्रत्येक वेळी तो महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेत असल्यानं हा वेगळाच प्रकार असल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिकाला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. ही घटना धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळं नागरिकांनी सतर्क होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like