बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून घेतला यू-टर्न, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डेहराडून । उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं गेल्या आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. ‘कोरोनिल’ नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्रीय आयुष मंत्रालयानं आणि उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. केंद्रीय आयुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या होत्या.

पतंजलीचं कोरोनावरील ‘कोरोनिल’ नावाचं औषध बाबा रामदेव यांनी बाजारात आणताच उत्तराखंड आयुष विभागानं कोरोनावर औषध बनवण्याची परवानगी दिली नव्हती असा खुलासा केला होता. याशिवाय पतंजलीला नोटीसही जारी केली होती. या नोटिसीला अखेर पतंजलीकडून उत्तर देण्यात आलं आहे. यासंदर्भात हिंदी माध्यमांनी वृत्त दिलं आहे. नोटिसीला उत्तर देताना पतंजलीनं करोनावर औषध बनवल्याचा दाव्यावरून पलटी मारली आहे. कोरोना बरं करणार कोणतंही औषध बनवले नसल्याचं पतंजलीनं म्हटलं आहे.

दरम्यान, पतंजलीनं कोरोनावरील औषध बाजारात आणल्यानंतर पतंजलीनं केवळ ताप, खोकला व प्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध बनवण्यासाठी उत्तराखंड आयुष विभागाकडून परवानगी घेतली होती. त्यांच्या अर्जात कोरोनाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे पतंजलीला नोटीस पाठवू, असं उत्तराखंड आयुष विभागाच्या परवाना अधिकाऱ्यानं म्हटलं होतं. त्यानंतर २४ जून रोजी पतंजली दिव्या फार्मसीला नोटीस बजावण्यात आली होती. सध्या केंद्र सरकारनं कोरोनाची जाहिरात व विक्री बंद केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय या औषधाच्या चाचण्या घेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment