Baba Siddiqui | बाबा सिद्दीकी यांची हत्या का करण्यात आली ? मोठे कारण आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Baba Siddiqui | राजकीय वर्तुळातून काल एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातील बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन लोकांना अटक देखील केलेली आहे. तसेच तिसरा आरोपी व्यक्ती कोण आहे? याचा शोध देखील पोलिसांकडून चालू आहे. अशातच आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे. आणि यांच्या हत्यामागचे नक्की कारण काय असावं? याची संभाव्य माहिती समोर आलेली आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? | Baba Siddiqui

हाती आलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए या प्रकल्पाच्या वादातून असावी. अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. परंतु अजूनही पोलीस अधिकाऱ्याने किंवा अधिकृत कुठल्याही व्यक्तीने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. परंतु अंदाज वर्तवल्याप्रमाणे सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाचा संदर्भ असावा अशी माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे पाहिले तर बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी देखील संबंध असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि आता पोलिसांनी ज्या दोन लोकांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही लक्ष शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या कशी झाली?

बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui ) यांच्यावर एकूण तीन लोकांनी गोळीबार केलेला आहे. यातील दोन लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एकाचे नाव करणैल तर दुसऱ्याचे नाव धर्मराज कश्यप आहेत यातील पहिला आरोपी करणैल सिंग हा हरियाणाचा आहे. तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. तसेच तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हे तिन्ही आरोपी रिक्षाने आले होते. तिघेजण बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui ) यांची वाट पाहत एका ठिकाणी थांबले होते. परंतु या हत्या प्रकरणात तिघां व्यतिरिक्त आणखी एक आरोपी असावा, असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. आणि हा चौथा आरोपी त्यांना मार्गदर्शन करत होता. असा संशय पोलिसांना आलेला आहे. आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास देखील कळता करत आहेत.

बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui ) यांच्यावर मुस्लिम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचे पार्थिव मरीन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाणार आणि त्याचे साडेआठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. तसेच त्यांचे पार्थिव हे त्यांच्या बांद्रा येथील राहत्या घरी अंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुस्लिम धर्मानुसार शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर बडा कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी केला जाईल.