बबन शिंदे यांची माघार, मात्र मुलाच्या उमेदवारीसाठी केविलवाणा संघर्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांनी माढ्यात लोकसभेला फिल्डिंग लावली… आणि एन मोक्याच्या टायमिंगला मोहिते पाटलांच्या हातात तुतारी देत रणजितसिंह निंबाळकर यांना पराभवाचा दणका दिला… लोकसभेचं तर झालं पण आता विधानसभेला माढा मतदारसंघातून अजितदादांसोबत गेलेल्या तब्बल सहा टर्मचे आमदार बबन शिंदे यांचा विषय खोल करण्यासाठी तुतारीकडून बबन शिंदे यांच्या सख्ख्या भावाची तसेच अनेक तगड्या उमेदवारांची चाचपणी शरद पवारांकडून केली जातेय… शरद पवारांची पॉलिटिकल पॉवर ध्यानात आल्यामुळे आता बबन शिंदेही पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्यासाठी धडपड करतायेत… त्यांच्या भेटी घेतायेत.. उमेदवारी कोणाला मिळेल, हा पुढचा मुद्दा… पण या सगळ्यात ट्विस्ट आलाय तो बबन शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे… मी सहा टर्म आमदार झालो पण यंदाच्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा रणजितला संधी द्या… थोडक्यात बबन शिंदेंनी विधानसभा निवडणुकीतून एक्झिट मारत मुलासाठी आता राजकारण तापवायला सुरुवात केलीय… त्यामुळे माढ्यात आमदार साहेबांच्या मुलाला जनता निवडून देईल का? शरद पवार बंडखोरी केलेल्या आमदाराच्या मुलाला तिकीट देतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माढा विधानसभेला मोहिते पाटील नेमकं कुणाच्या पारड्यात झुकत माप टाकतील? त्याचंच हे सविस्तर डिकोडिंग…

मी आयुष्यभर लोकात राहून काम केलं आणि त्यामुळेच तुम्ही मला आजवर सहा वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी केले. आता यंदाच्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा रणजीत भैय्याला संधी द्या… असं वाक्य होतं माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचं… बबन शिंदे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार… शिंदेंच्या या वक्तव्यानंतर ते माढा विधानसभेच्या रिंगणात नसतील हे कन्फर्म झालय… आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे…. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजितदादांना साथ दिली… पण लोकसभेला शरद पवारांची ताकद कळल्यावर आणि महायुतीच्या विरोधात असणार राज्यभरातील वातावरण पाहून बबन शिंदेंची धाकधूक वाढली… म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या मूळ घरी शरद पवारांची तुतारी हातात घेण्यासाठी त्यांची धडपड चालू असल्याचं आपल्याला अनेकदा पाहायला मिळालय… शरद पवारांच्या त्यांनी अनेकदा भेटीही घेतल्या… पण कदाचित बबन दादांनी फुटीत पंगा घेतल्याने आता त्यांना इंगा दाखवण्यासाठी सुप्रिया सुळे त्यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराची चाचणी करतानाही पाहायला मिळाल्या… त्यात विद्यमान आमदार साहेबांनी आपल्या मुलाच्या नावावर म्हणजेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना उमेदवारी पुढे करून स्वतः माघार घेतल्याने माढाचं राजकारण कमालीचं बदलून गेलं आहे…

Baban Shinde यांची माघार मात्र मुलाच्या उमेदवारीसाठी केविलवाणा संघर्ष | Madha Vidhan Sabha

खरंतर लोकसभेचा कौल तुतारीच्या बाजूने गेल्यामुळे यंदा शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करताना दिसतोय… आमदारकी टारगेट करूनच शिवसेनेच्या संजय कोकाटेंनी तुतारी हाती घेतली… शिवाजी कांबळे देखील माढा विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच भाजपातून राष्ट्रवादीत आले… थोडक्यात विधानसभेला माढ्यात जिंकणार तर राष्ट्रवादीच, हे कन्फर्म समजूनच इथली राजकीय समीकरणे बदलत असल्याने प्रत्येकालाच तिकीट मिळावं, यासाठी संघर्ष करावा लागतोय… पण शरद पवारांनीही अद्याप माढ्यातून आपला उमेदवार कोण हे गुलदस्ता ठेवल्यान सगळेच सध्यातरी गॅसवर आहेत… या सुप्रिया ताईंनी आमदार साहेबांचे लहान बंधू रमेश शिंदे यांची दिल्ली दरबारी भेट घेतल्याने इथून त्यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांचं नावही चर्चेत आलय… असं झाल्यास माढा विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे… तुतारी विरुद्ध घड्याळ असा कौटुंबिक संघर्ष पाहायला मिळू शकतो… त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी नेत्यांच्या मुलांना तिकीट देणार की निष्ठवंतांना संधी देणार, यावर इथल्या राजकीय समीकरणांवर भाष्य करण, सोपं जाणार आहे…

तसं पाहायला गेलं तर सहा टर्मचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांची प्रकृती ठीक नाही… ते शरद पवारांचे निष्ठावंत समजले जायचे.. मात्र लोकसभेच्या आधी झालेल्या राष्ट्रवादीच्या फुटीत मात्र त्यांनी आपली निष्ठा बदलली.. आणि अजितदादांना आपला पाठिंबा देऊ केला… मात्र लोकसभेचा निकाल फिरल्यानंतर आता बबन शिंदेही आपली राजकीय भूमिका बदलत असतील तर शरद पवार ना त्यांच्यावर कितपत विश्वास टाकतील? हा देखील कळीचा मुद्दा आहे… त्यातही मला नाही माझ्या मुलाला निवडून द्या… भविष्यात नवीन पिढी विधानसभेत जात असताना तुम्ही रणजीत भैय्याला एक संधी द्यावी तो कसे काम करतो हे पाहा. जर तुम्हाला काम नाही आवडलं तर पुढच्या वेळी मत द्यायचं की नाही ते ठरवा. मात्र या वेळेला भैय्याच्या पाठीमागे उभे राहा… असं बोलून आमदार साहेबांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला..आमदार साहेब बबन शिंदे एवढेच बोलले नाहीत. तर यापुढे बोलताना म्हणाले की, कामाच्या माणसालाच निवडून देणे गरजेचे असून प्रत्येक वेळी माझ्याकडून जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. गरिबातला गरीब माणूस जरी दिसला तरी मी गाडी थांबून बोलतो. अशाच पद्धतीने रणजीत भैय्याही काम करेल. जनता हीच माझी ताकद आहे आणि त्यामुळेच तुम्ही माझ्याप्रमाणे भैय्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

त्यामुळे यंदा रणजीत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील हे तर कन्फर्म आहे… मात्र त्यांचा पक्ष कुठला हे आत्ताच सांगता येत नाही… निवडणूक लढली तर तुतारीच्याच चिन्हावर असा सध्या त्यांचा प्रयत्न असल्याने जर तिकीट मिळालं नाही तर केवळ अपक्ष उमेदवारी हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर राहतो… त्यातही मोहिते पाटील आणि संजय मामा शिंदे हे एकमेकांचे कट्टर विरोधक… लोकसभेलाही शिंदे बंधूंनी तुतारीच्या विरोधात म्हणजेच मोहिते पाटलांच्या विरोधात काम केलं, त्यामुळे जरी राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळालं तरी मोहिते पाटील हे त्यांचा कितपत प्रचार करतील, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको.. बबन शिंदे आणि त्यांचे चिरंजीव सध्या चांगल्याच राजकीय संकटात सापडलेत.. त्यामुळे आपल्या सहा टर्मच्या अनुभवाच्या जोरावर बबन शिंदे आपल्या मुलाकडे आमदारकीचा पुढचा वारसा देण्यात यशस्वी ठरतील की जनता नव्या उमेदवाराच्या पाठीशी आपलं निर्णायक मतदान देईल? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा