पुणे प्रतिनिधी |शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा असा पद्मविभूषण हा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांच्या हस्ते त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी तहसिलदार तृप्ती काेलते – पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते.
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र घराेघरी पाेहचविण्याचे काम केलय. आणि त्यांनी त्यांच्या शाहिरीतून तसेच लेखनातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहास उजेडात आणला. त्यांच्या या याेगदानासाठी पूर्वी त्यांना महाराष्ट्रभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
बळवंतर माेरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना 11 मार्च 2019 राेजी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार हाेता. परंतु या साेहळ्यासाठी वैयक्तिक कारणास्तव पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्कार ( पद्म विभूषण पदक, मिनिएचर व सनद (प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला.