नेदरलँडची महिला क्रिकेटपटू बाबेट डी लीडेने केला ‘हा’ विश्वविक्रम, MS धोनीलाही टाकले मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेदरलँडची महिला यष्टिरक्षक बाबेट डी लीडेने (Babette de Leede) इतिहास रचला आहे. बाबेट कोणत्याही टी-20 सामन्यात सर्वाधिक स्टंपिंग करणारी महिला यष्टिरक्षक बनली आहे. बाबेटने बुधवारी फेअरब्रेक स्पर्धेत फाल्कन्स महिलांविरुद्ध ही कामगिरी केली आहे. सॅफायर वुमनकडून खेळणाऱ्या बाबेट डी लीडेने (Babette de Leede) या सामन्यात एकूण पाच स्टंपिंग केले आहे. बाबेट डी लीडेने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स, श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू, क्रिस्टीना गॉफ (जर्मनी), नन्नपत कोंचरोएनकाई (थायलंड) आणि जहांआरा आलम यांना यष्टिचित केले आहे.

याआधी, अनेक यष्टिरक्षकांनी मान्यताप्राप्त T20 (पुरुष/महिला) क्रिकेटच्या एका डावात चार स्टंपिंग केले होते. मात्र कोणीही एकाच सामन्यात पाच स्टंपिंग केले नव्हते.टीम इंडिया आणि आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, कामरान अकमल, टोनी फ्रॉस्ट, दिनेश रामदिन आणि धीमान घोष यांनी प्रत्येकी चार स्टंपिंग केले आहेत. एमएस धोनी, रिद्धिमान साहा यांसारख्या खेळाडूंच्या नावावर 3-3 स्टंपिंग आहेत.

फाल्कन्स महिलांचा 30 धावांनी पराभव झाला
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सॅफायर वुमन संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 152 धावा केल्या. अ‍ॅलिस विलानीने 71 आणि बाबेट डी लीडेने (Babette de Leede) 45 धावांचे योगदान दिले. फाल्कन्सतर्फे चमारी अटापट्टू, एस टिपोच आणि मरीना लॅम्पलो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या फाल्कन्स महिला संघाचा संपूर्ण संघ 20 षटकात सात विकेट्सवर केवळ 122 धावा करू शकला आणि त्यांना तीस धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. संघाच्या चमारी अटापट्टूने 30 आणि कर्णधार सुझी बेट्सने 25 धावांचे योगदान दिले. या सामन्यात सना मीरला सर्वाधिक चार विकेट मिळाले. फेअरब्रेक स्पर्धा ही एक ICC मान्यताप्राप्त स्पर्धा आहे जी 1 ते 15 मे दरम्यान दुबई येथे आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आयर्लंड, नेपाळ, थायलंड येथील महिला क्रिकेटपटूंना काही नामवंत खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते.

हे पण वाचा :
आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा

‘ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर काय बोलायचे?’; ओवेसींचा राज ठाकरेंवर निशाणा

खुन की आत्महत्या? कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य

3 IPL टीमकडून खेळलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल

Leave a Comment