हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लग्न झालेली जोडपी त्यांचे करिअर तसेच नोकरीच्या मागे लागत, मुलांना खूप उशिरा जन्म देण्याचा निर्णय घेतात. परंतु वय वाढल्याने मुलांना जन्म देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आजकाल अनेक लोक वंध्यत्वाच्या सामना करत आहेत. परंतु टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर करून IVF तंत्रज्ञानाच्या आधारे मुलांना जन्म देत आहे. तसेच याला टेस्ट बेबी असे देखील म्हटले आहेत. परंतु या IVF तंत्रज्ञानातही अनेक धोके जाणवत असल्याची माहिती समोर आलेली.
IVF तंत्रज्ञान म्हणजे काय
ज्यावेळी महिलांच्या अंडाबिजाचे फलन होत नाही. त्यावेळी लॅबमध्ये स्त्रीच्या अंडबीजाचे कृत्रिमरित्या फलन केले जाते. आणि पुरुषाच्या स्पर्मने ते फलन होते. यातून गर्भधारणा केली जाते. त्यानंतर भ्रूनाचा विकास करून नंतर ते भ्रूण महिलांच्या गर्भाशयात पुन्हा टाकले जाते. आणि अगदी नॉर्मल माणसाप्रमाणे प्रेग्नेंसीचा काळ जातो आणि डिलिव्हरी देखील होते.
संशोधनात काय आढळले
या तंत्रज्ञानाबद्दल एक मोठा अभ्यास करण्यात आलेला आहे. या अभ्यासात असे अधलून आलेले आहे की, जी मुलं नैसर्गिक रित्या गर्भधारणा करून जन्माला येतात. ती मुले जास्त सुदृढ असतात. परंतु IVF तंत्रज्ञानाने जन्माला आलेल्या मुलांना हृदयासंबंधित अनेक आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावेळी IVF तंत्रज्ञानाने जन्माला आलेल्या 7.7 दशलक्ष लोकांसाठी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये IVF ने जन्मलेल्या मुलांना गर्भात किंवा जन्माला येण्याच्या आधी हृदयासंबंधी आजार आढळला आहे. परंतु नैसर्गिक रित्या जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये हा धोका नाही. तसेच IVF तंत्रज्ञानाचा आधार घेऊन जन्माला आलेली मुलं ही वेळेच्या आधी जन्माला येण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. तसेच त्यांचे वजन देखील प्रमाणापेक्षा कमी असल्याचे समोर आलेले आहे.
IVF तंत्रज्ञानाचा वापर त्या लोकांसाठी आहे. ज्यांना मुलांना जन्माला घालण्यासाठी काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करायची असेल, आणि मुलांना जन्म द्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच योग्य वयात लग्न आणि योग्य वयात मुले जन्माला घालण्याचे नियोजन तुम्ही करू शकता. त्यामुळे भविष्यात जाऊन तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.