हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कुस्तीचा अंतिम सामना गमावल्यानंतर महिला कुस्तीपटू बबिता फोगट हिची मावस बहीण रितिका निराश झाली आणि तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. . बलली गावात तिने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.
14 मार्च रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यामध्ये रितिकाला एक गुणाने सामना गमवावा लागला. या पराभवानंतर रितिका शॉकमध्ये गेली आणि त्यानंतर तीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. असे म्हटले जात आहे की त्या स्पर्धेत द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारा महावीर फोगटही उपस्थित होता. रितिकाने पंखामध्ये स्कार्फ लावत स्वत: ला गळफास लावला. मीडिया रिपोर्टनुसार पोस्टमॉर्टमनंतर रितिकाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, तर पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
फोगाट सिस्टर भारतीय महिला कुस्तीमध्ये सर्वश्रुत आहेत. गीता फोगाट आणि बबिता फोगट यांनी स्वतःच्या खेळावर भारताचा अभिमान वाढविला आहे. त्यांची मावस बहीण रितिका ही सुद्धा कुस्तीमध्ये देशाचा अभिमान वाढवू इच्छित होती आणि त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती. तथापि, कुस्तीतील रितिकाचा प्रवास खूपच छोटा होता आणि राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर तिने आत्महत्या केली