Wednesday, October 5, 2022

Buy now

टेंभू_सयापुर सोसायटीच्या चेअरमनपदी बब्रुवान पाटील बिनविरोध

कराड | टेंभू-सयापूर विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजले पासून यावेळची निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा होती. मात्र, दोन्हीकडील नेत्यांनी मेळ घालत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध करण्यावर शिककामोर्तब करण्यात आला.

यामधे जोतीर्लिंग पॅनेलला पाच वर्षासाठी चेअरमन पदासह सहा जागा दिल्या. तर ग्रामविकास पॅनेलला सात जागा देवून व्हा. चेअरमनपद देण्यात आले. मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये चेअरमन पदी बब्रुवान हिंदुराव पाटील तर व्हा चेअरमन पदी रमेश शंकर जाधव यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक विलास मोरे यांनी काम पाहिले विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे रघुनाथ बाबुराव पाटील, धोंडीराम पांडुरंग जाधव, विलास मानकू सावंत, संजय नारायण हुलवान, रंजना सदाशिव महाडिक, रामचंद्र भानुदास कदम, संजय भगवान कुंभार, मंगल मोहन यादव, रामकृष्ण बाबुराव जाधव, विकास शिवाजी घाडगे, अशोक दादू भंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ज्योतिर्लिंग पॅनेलचे नेतृत्व सयाजी पाटील, शिवाजी पाटील, शिवलिंग जंगम, माजी उपसरपंच तात्यासो लेंगरे, माजी उपसरपंच प्रताप सावंत, विलास भंडारे, रामचंद्र भुसारी, भीमराव पाटील, वसंत भोसले, विनायक कदम, जयवंत पाटील यांनी केले. तर ग्रामविकास पॅनेल नेतृत्व सोसायटीचे माजी चेअरमन मोहनराव बाबर, सरपंच युवराज भोईटे, निवासराव जाधव, दत्तात्रय चरेगावकर, मधुकर पाटील, अधिकराव नलवडे यांनी केले. चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.