हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लढणं रक्तात असलेल्या बच्चूभाऊ कडू (Bachhu Kadu) यांनी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांच्या समाधीस्थळी आज भेट दिली. शौर्याचं आणि साहसाचं प्रतीक असलेल्या शिवरायांकडून समाज आणि राजकारणाचे बरेच धडे बच्चूभाऊंनी गिरवलेत. आज त्या इतिहासाची आठवण ठेवत बच्चूभाऊंनी २३०० पायऱ्या चढत रायगड सर केला. गडावरील शिकाई मंदिराजवळ त्यांनी शेतकरी माऊलीकडून ताक घेऊन आपली तहान भागवली.
उद्या दि १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण रायगडाच्या भोवतीने २० किलोमीटरची पायी परिक्रमा ते पूर्ण करतील. राज्यभरातील दिव्यांग जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासोबतच राज्यातील बळीराजा आणि कष्टकरी बांधव सुखी व्हावा हा संकल्प बच्चूभाऊ या परिक्रमेच्या निमित्ताने करत आहेत. सर्व सहृदयी सहकाऱ्यांच्या प्रेमाने ही परिक्रमा बच्चूभाऊ यशस्वी करतील हा विश्वास आहेच. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे सिंहगडाच्या लढाईत धारातीर्थ झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली कवड्याची माळ तानाजींना अर्पण केली. त्यांच्या वंशजाने आजही ती माळ सांभाळुन ठेवली आहे. मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी हा ऐवज स्वतः अनुभवल आला. महाराजांचा सहवास लाभलेला माळेचा स्पर्श हा प्रयागराजच्या महाकुभाचे शाहीस्नान झाले असे आम्ही समजतो असं बच्चू कडू यांनी म्हंटल…..
खरं तर बच्चू कडू हे महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, दिव्यांग बांधवांसाठी लढणारे, त्यांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवणारे राज्यातील एकमेव नेते म्हणून ओळखले जातात.. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून त्यांनी दिन-दुबळ्या जनतेला न्याय देण्याचं काम केलंय.. प्रामुख्याने अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलने केली.. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात बच्चू कडू यांच्याबद्दल कायमच आदर राहिलाय…