पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांचा विचार करून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ही माहिती दिली आहे.

‘आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच 21 जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येण्याचे निर्देश आज देण्यात आले.’ असे बच्चू कडू यांनी ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहता देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मार्च च्या शेवटच्या आठवड्यापासून शाळा बंद होत्या. परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी राज्य सरकारने याआधी काही बैठका घेतल्या आहेत. जुलै मध्ये ऑनलाईन वर्ग सुरु करण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. आता ते सुरु होतील अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment