‘कामाची फाईल थांबली तर तुमची नोकरी थांबली’; मंत्री बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

“माझ्या खात्याच्या अंतर्गत येणारी कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर त्या अधिकाऱ्याची नोकरी थांबली समजा ” अशा खड्या शब्दात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. बच्चु कडु आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विभागांची एकत्रित बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्यमंत्री बच्चु कडु यांनी जिल्हापरिषदेच्या सभागृहात जिल्हयातील महिला व बालविकास, जलसंपदा,शालेय शिक्षण विभागाची एकत्रित बैठक घेतली. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बच्चु कडु यांनी काही निर्देश दिले. यात जिल्हयातील सामान्य लोकांच्या आणि प्रलंबित कामांच्या तक्रारीवर माहिती घेण्याचे सांगितले. तसेच ज्या विभागातील फाईल्स आज पर्यन्त प्रलंबित आहेत यावर संबधित विभागातील अधिकाऱ्याने या फाईलींच्या प्रवासाचा संपुर्ण घोषवारा पुढील महिन्यात सादर करावा असे आदेश कडू यांनी दिले.

दरम्यान, ”यापुढील काळात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे राज्यमंत्री बच्चु कडु यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. कुठल्याही कामाची फाईल विनाकारण थांबता कामा नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सेवा हमी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.” अशी तंबी कडू यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.

 

Leave a Comment