अमरावती प्रतिनिधी । निव्वळ आश्वासन देऊन आम्हाला कुणाचीही दिशाभूल करायची नाही. बच्चू कडू यांनी केलेल्या १७ मागण्यापैकी १५ मागण्यांबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी स्वतः चर्चा करणार असून त्या लवकर मगरी लावल्या जातील तेच इतर महत्वाच्या दोन मागण्या आहेत त्यापैकी एक दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत येणाऱ्या ३ जूनच्या बजेटच्या अधिवेशनातविषय मांडला जाईल व त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि दुसरी महत्वाची कर्जमाफीची मागणी. कर्जमाफी हि एका दिवसात घोषित करता येत नाही. शेतकऱ्यांची वर्गवारी नुसार त्याला कर्जमाफी द्यावी लागणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल त्या समितीत बच्चू भाऊ यांना निमंत्रित करून त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल यानंतर समिती जो निर्णय देईल त्यानुसार आम्ही कर्जमाफी करू, असे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच अन्नत्याग आंदोलन पाच दिवसापासून सुरु आहे. दरम्यान, आज सहाव्या दिवशी महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रताप अडसरकर, आवलकर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदि उपस्थित होते.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी अनेक १७ मागण्यांवर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजूर, अपंग दिव्यांगांना व शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून जनेतला न्याय मिळण्याकरिता मागील ६ दिवसापासून आंदोलन सुरु केले. उपोषण सुरु झाल्याच्या दुसऱ्यादिवशी बच्चू भाऊ याच्यासोबत बोललो होतो. त्यावेळी विनंती केली. तोडगा काढण्याची. त्यावेळी बच्चूभाऊंनी सांगितले कि राज्यातील महत्वाच्या चार मंत्र्यांशी बोलणे करून द्या.
त्यावेळी मी त्या त्या मंत्र्यांशी बोललो. बच्चू भाऊंनी केलेल्या मागण्याचे काही मुद्दे आहेत कि ते तातडीने मान्य होऊ शकतात. आज मी ठरवलं आहे कि बच्चूभाऊंनी जे चार मंत्री सांगितले आहे त्याची एकत्रित बैठक घेत त्या बैठकीत बच्चूभाऊ यांना सोबत घेऊन त्या मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन आदेश काढू. महत्वाचे दोन मुद्दे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा हा दिव्यांगांचे अनुदान वाढणे हा आहे. इतर राज्यात काय केले आहे त्याचा अभ्यास करून मुख्यमंत्र्याना सांगितले जाईल. येणाऱ्या ३ जूनला अधिवेशन होणार आहे. त्या अधिवेशनात मागण्या मांडल्या जातील शेवटी पैसे द्यायचे आहे. दिव्यांगांचे अनुदान किती वाढणार आहे त्याचा अभ्यास करावा लागणार आहार. मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू असे तिघे बसून यावर चर्चा केली जाईल.
आश्वासन देऊन आम्हाला दिशाभूल करायची नाही. येणाऱ्या ३ जूनच्या बजेटच्या अधिवेशनात दिव्यांग, अपंगाच्या मानधनाची वाढ हि बजेटमध्ये मांडून त्यावर निर्णय घ्यावी लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा कर्जमाफीचा आहे. कर्जमाफी हि एका दिवसात घोषित करता येत नाही. शेतकऱ्यांची वर्गवारी नुसार त्याला कर्जमाफी द्यावी लागणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल त्या समितीत बच्चू भाऊ यांना निमंत्रित करून त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल यानंतर समिती जो निर्णय देईल त्यानुसार आम्ही कर्जमाफी करू. १७ मागण्यापैकी १५ मागण्यांबाबत मी स्वतः त्या त्या खात्याच्या मंत्र्यांशी बैठक घेऊन मार्गी लावेन, असे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
बावनकुळे यांच्या आश्वासनांनंतर बच्चू कडू यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार कर्जमाफी व दिव्यांग मानधनवाढीबाबत सकारात्मक आहे, कर्जमाफीबाबत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी ठरवली जाणार आहे. त्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. त्या समितीमार्फत अभयास करून चर्चा करून निर्णय घेतला जाईल व त्यानंतर आम्ही उद्या कार्यकर्त्यांशी बोलून आमचा निर्णय घेऊ, असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे बच्चू कडू उद्या काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.