Bachhu Kadu Chakkajam Andolan : गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू; शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक

Bachhu Kadu Chakkajam Andolan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bachhu Kadu Chakkajam Andolan। आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली, तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकार विरोधातील आपली आक्रमकतेचा धार आणखी बोथट केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा नि पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी आज बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी ८ दिवस अन्नत्याग उपोषण केलं होते. यानंतर विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. आता सरकारला आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू यांच्याकडून चक्काजाम आंदोलन (Bachhu Kadu Chakkajam Andolan) करण्यात आले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप बघायला मिळालं. ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले. सरकार विरोधीच घोषणाबाजी करण्यात आली. शेतमजूर, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ अशा सर्वच समाजातील लोकांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच अनेक आमदार- खासदार यांच्यासह काही राजकीय पक्षांनीही बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला.

गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू- Bachhu Kadu Chakkajam Andolan

परतवाडा येथील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांनी म्हंटल, कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत, तर मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र, सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात आहे. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. त्यामुळे आता आमची गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली आहे. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.