अमरावती प्रतिनिधी Bachhu Kadu Chakkajam Andolan । शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मागणीला हमीभाव या दोन्ही मागण्यांवर राज्य सरकार कडून म्हणावी अशी ठोस भूमिका बघायला न मिळाल्याने प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २४ जुलैला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्टरातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमार असा सर्वच समुदाय या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विद्रोह यावेळी आपल्याला बघायला मिळेल.
खरं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी करु अशा घोषणा महायुतीने दिल्या होत्या. मात्र आता सरकार येऊन १० महिने होत आले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही या सरकारने केलेली नाही. बच्चू कडू यांनी या कर्जमाफीसाठी ८ दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. सातबारा कोरा कोरा पायी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा आवाज सरकार पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून समिती स्थापन करतोय असं मिळमिळीत उत्तर मिळाले. खरं तर मागच्या ३ महिन्यात महाराष्ट्रातील ७६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. हि नक्कीच राज्याची मान शरमेने खाली घालवणारी बाब आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी एकवटणार आहे.Bachhu Kadu Chakkajam Andolan
२४ जुलै २०२५ , वार – गुरुवार या दिवशी सकाळी ८ ते १० अशा २ तासांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासोबतचे हे एक सर्वसामावेशन आंदोलन असेल. सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्ये शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी होतील. यावेळी आपले गाव, तालुका, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी चक्काजाम करावे. आंदोलनावेळी रुग्णवाहिकेस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा – Bachhu Kadu Chakkajam Andolan
अनेक पक्षांनी आणि संघटनेने या चक्काजाम आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, खासदार बजरंग सोनावणे, अमोल कोल्हे, निलेश लंके, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत ओगले, आमदार प्रकाश सोळंके, खासदार भास्कर भगरे, यांच्यासह, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस, यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या चक्कजाम आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. Bachhu Kadu Chakkajam Andolan
एवढच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा ग्रामपंचायतीने चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देणारा एक ठराव मंजूर करून घेतला आणि मोठ्या प्रमाणावर यात सहभाग घेणार असल्याचं जाहीर केलं.




