Bachhu Kadu On Leopard : बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसला पाहिजे- बच्चू कडू

Bachhu Kadu On Leopard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bachhu Kadu On Leopard । लोकवस्तीवर आणि शेतात बिबट्याचा (Leopard) वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बिबट्याने अनेकांचा जीव घेतल्याच्या घटना दररोज पाहायला मिळतायत. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात तर बिबट्याची मोठी दहशत आहे. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अशावेळी बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये म्हणून सरकार जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी सडकून टीका केली आहे. तसेच बिबट्यावरून सध्या विधानसभेत सुरु असलेल्या राड्यावरूनही बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

तुम्हाला लाज वाटली पाहिजे- Bachhu Kadu On Leopard

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. बिबट्या सध्या फक्त शेतकऱ्यांच्या घरात घुसतो. बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसला पाहिजे, तो कलेक्टरच्या घरात घुसला पाहिजे, मीडियावाल्यांच्या घरात घुसला पाहिजे… मगच सरकारला जाग येणार… एखाद्या आमदाराचा रस्त्यावर एक्सीडेंट झाला तर लगेच तो रस्ता दुरुस्त केला जातो. मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यावर खड्डा दिसणार नाही याची काळजी घेतली जाते… आणि दुसरीकडे आमचा शेतकरी रोज मरतोय त्याकडे कोणाचं लक्ष नाही. हे असं असतं का रयतेचं राज्य? असा सवाल बच्चू कडू यांनी केला…. तुम्हाला लाज वाटली पाहिजे दरवर्षी 400 500 लोक मरतात असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

बच्चू कडू पुढे म्हणाले, हजार बिबट्यांचा तुम्ही बंदोबस्त करू शकत नाही (Bachhu Kadu On Leopard) …जाऊ तिथं खाऊ हे सरकारचे धोरण आहे.1000 शेळ्या सोडल्या असं सांगणार आणि 200 शेळ्या सोडणार. बाकीचे हेच खाणार. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेलच. कर्जमाफी योग्य पद्धतीने केली नाही तर फक्त विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वेचे चाक धावणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.