खडसेंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला . फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ खडसे मिळाल्यामुळे त्यांना चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांना शरद पवारांनी संबोधित केले.

जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम चांगलं सुरू आहे. आता त्यांना नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ मिळेल. संघटना आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाची जयंतरावांना साथ मिळालीय. त्यामुळे सामान्य माणसाला अडचणीतून बाहेर काढता येईल, असं पवार म्हणाले होते.

एकनाथ खडसे भाजपवर टीका करताना म्हणाले, आयुष्याचे ४० वर्ष भाजपमध्ये काम केलं. पण विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. माझं काय चुकलं? या प्रश्नाचं उत्तर मला या क्षणापर्यंत मिळालं नाही

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’