शेतकऱ्याला शेती परवडत नाही आता गांजा, अफूचे पीक घेऊन द्यावे; ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेतून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा

bachhu kadu padyatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि जिल्हा परिषद त्यांची आहे. महानगर पालिकेपासून घरावर सुद्धा भाजप वाल्यांचे झेंडे असून आता शेतात झेंडे लावायचे राहिले होते ते सुद्धा लागले. नाही तरी शेतात पेरून काही फायदा नाही. आज अशी अवस्था आहे कि पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही. ३४०० रुपयेमध्ये सोयाबीन गेले, ४ क्विंटल पिकले एका एकरमध्ये १५ हजार रुपयांचेसोयाबीन आले आणि खर्च आला ८० हजार रुपये. मग पीक घेण्यापेक्षा झेंडे लावलेले बरे आम्ही तुमच्या पक्षात आमच्या शेत सकट येतो आणि कमळ लागले कि घेऊन जातो. हिंदू मुसलमान करून शेतकऱ्याला भिकेला लावलं. आता शेतात पीक घेण्यापेक्षा भाजपचे झेंडे पेरतो. म्हणजे वावरासकट आम्ही तुमच्या पार्टीत येतो. म्हणजे कमळ लागले कि त्याला तरी बाजारभाव द्याल, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी भाजपवर निशाणा साधला.

बच्चू कडू यांची ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रा (Sat Bara kora Kora Yatra) चा आज दुसरा दिवस असून सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात त्यांना भाजपचे झेंडे लावलेले दिसून आले. शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला असतानाच शेतात लावलेले फलक देखील लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार हे बैलगाडीवर बसल्याचे छायाचित्र या फलकावर आहे. आता पेरणी करणे बंद, गोरगरीब लोकांच्या जीवावर उठलेले म्होरके, आता एकतर गांजा, अफूचे पीक, नाहीतर पक्षाचे झेंडे, असा उल्लेख या फलकावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सरकारनेच दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी कोणती समिती गठीत केली काय? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती कशाला तयार करत आहेत, थेट घोषणाच केली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,” या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून आक्रमक सुरुवात केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे पार करत 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे.