कांद्याला दिलेल्या अनुदानात मंत्र्यांच्या कपड्याची इस्त्रीही होणार नाही : बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चांदवड | सरकरने शेतकऱ्यांची पिळवणूक करत कांद्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ‘सरकारने दिलेल्या अनुदानात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कपड्यालाही इस्त्री होणार नाही’ असा टोला कडू यांनी यावेळी लगावला. कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर उपसरमारीची वेळ आली आहे. त्याच निषेधार्थ चांदवड प्रांत कार्यालयावर आमदार कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता.

सरकार पाकिस्तानला गोळ्या घालण्याऐवजी मोदी तिथून कांदा घेऊन आले आणि त्यामुळेच देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. सत्ताधारी शेतकऱ्यांची दिशाभूल करतात तर भुजबळ, विखे पाटील सारखे विरोधक कांद्याचे भाव कमी करण्यासाठी लक्षवेधी मांडतात अशी परिस्थिती आहे. कांद्याला प्रतिक्विंटल १००० रुपये भाव जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहणार असा इशारा कडू यांनी दिला आहे. दरम्यान हे अनुदान लागू होऊपर्यंत किमान ५०० रुपये अनुदान मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

२०१६ पासून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. मात्र अधिकाऱ्यांना महागाई भत्ते कसे मिळतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी मंत्र्यांना कांदे फेकून मारा असे सांगणारे राज ठाकरे हे प्रत्यक्षात का तसे करत नाही . इतकेच आहे तर राज ठाकरेच्या घराजवळच मंत्र्यांची घरे आहेत. त्यांनीच पहिल्यांदा कांदा मारण्यास सुरुवात करावी, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल शेतकर्यांसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर

शेतकऱ्यांना आम्ही दिलेली मदत त्यांना कमीच वाटणार, सदाभाऊ खोत यांचा राज ठाकरे, जयंत पाटील यांना टोला

Leave a Comment