… तर फडणवीसांची खुर्ची जाईल; कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा थेट इशारा

bachhu kadu devendra fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्रजी, तुम्ही जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर तुमची खुर्ची सुद्धा राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे राज्यस्तरीय पदाधिकारी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात ते बोलत होते.

यावेळी आपल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले, निवडणुका दुय्यम आणि आंदोलन प्रथम हाच आपला कानमंत्र आहे. आपल्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे कर्जमाफी देणार नाही म्हणणाऱ्या सरकारला ६ महिन्यात वठणीवर आणलं आहे. एकही आमदार नसताना आपण सरकारला नाचवलं आहे. देवेंद्र फडणवीसाना शेवटी शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार करावी लागली. परंतु आपल्याला फक्त समिती नको आहे, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. हा फक्त ट्रेलर होता… पिक्चर अभी बाकी है असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला. ही लढाई शेतकरी कष्टकरी आणि दिव्यांगाची आहे. या लढाईच्या माध्यमातून आपला अंकुश सरकारवर असावा. आपल्याला राज्यभरातील सर्व संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकारला आपल्यासमोर, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगा समोर झुकलेच पाहिजे.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या मतचोरी आरोप आणि बोगस मतदान प्रकरणावरूनही बच्चू कडू यांनी भाजपवर आपली तोफ डागली. ? EVM हे काँग्रेसचे पाप आहे पण त्याचा वटवृक्ष भाजपने केला. भाजपने लोकांचं मत चोरले त्यामुळे तुमचं आमचं अस्तित्व संपलं. देशाच्या लोकशाहीचे संविधान उघड पाडण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे भाजप विरोधात रान उठवा …. स्वातंत्र्यानंतर च्या स्वातंत्र्याची हि एक नवीन लढाई आहे. कारण मतदानाचा अधिकार गेला तर लोकांना कोण विचारेल?? असा सवालही बच्चू कडू यांनी केला. मतदानात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा नसेल तर लोकशाईला अर्थ नाही असं बच्चू कडू यांनी म्हंटल.