हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ (Ladaki Bahin Yojana)योजनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या योजनेवरुन विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. बच्चू कडू यांनी सरकारने महिलांना मदतीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप केल आहे. यासह, ही योजना महिलांसाठी नव्हती तर फक्त मतं मिळवण्यासाठी राबवण्यात आली असल्याचे त्यांनी म्हणले आहे.
महायुती सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. निवडणुकीदरम्यान सत्तेत परत आल्यास योजनेचा हप्ता २१०० रुपये केला जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आता अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “निवडणुकीपूर्वी सरकारने कोणत्याही पारदर्शक प्रक्रियेशिवाय महिलांच्या खात्यात पैसे जमा केले. निवडणूक जिंकल्यावर मात्र त्याच महिलांना अपात्र ठरवले जात आहे. हा मोठा गुन्हा असून, लाडक्या बहिणींनी आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे,” असे बच्चू कडू यांनी म्हणाले आहे .
“सरकारने मतं घेतली, आता पैसे काढत आहेत”
त्याचबरोबर, बच्चू कडू यांनी सरकारवर मतांसाठी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे . “सत्तेत येण्यासाठी करोडो महिलांना निकष तपासल्याशिवाय पैसे दिले. आता मात्र त्या अपात्र ठरत असल्याचे सांगत त्यांची नावे वगळली जात आहेत. आधीच त्यांची पात्रता तपासली असती, तर ही परिस्थितीच आली नसती,” असे ही त्यांनी म्हणाले आहे.
दरम्यान, सरकारकडून योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे. सध्या ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे त्यांना अपात्र ठरवले जात आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७५ हजार महिलांच्या घरात चारचाकी गाड्या असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून या महिलांची चौकशी केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत ३८ महिलांनी स्वयंप्रेरणेने योजनेतून माघार घेतली आहे. तर काहींनी मिळालेले पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूनच विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.




