Bad Habit : गरम चहासोबत सिगारेट फुकण्याची सवय देते कर्करोगाला आमंत्रण; वेळीच थांबा नाहीतर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bad Habit) बऱ्याच लोकांची सकाळ चहासोबत होते. तर काही लोकांची सकाळ चहा आणि सिगारेट सोबत होते. सिगारेटच्या पाकिटावर ती आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे लिहिलेलं असत. पण तरीही लोक हसत हसत सिगारेटसोबत आपलं आयुष्य जाळताना दिसतात. बऱ्याच लोकांना चहाची टपरी दिसली की, चहासोबत सिगारेट पिण्याची तलफ येते.

तुम्ही कोणत्याही टपरीवर पहा, नुसता चहा पिणारे कमी आणि चहा- सिगरेट पिणारेच जास्त दिसतात. पण हे लोक स्वतःहून आपल्या आरोग्याची चिंता वाढवत आहेत, हे यांच्या लक्षात येत नाही. कारण, नुसती सिगारेट जितकी धोकादायक आहे त्याहून जास्त ती चहासोबत पिणे जास्त डेंजर आहे. चला याविषयी जाणून घेऊ.

चहा सोबत सिगारेट प्यायल्याने काय होतं?

बऱ्याच लोकांना चहासोबत सिगारेट पिण्याची सवय असते. ताणतणाव कमी करण्यासाठी आपण चहासोबत सिगारेट ओढतो, असं यांचं म्हणणं असत. पण खरतर या सवयीमुळे ताणतणाव कमी व्हायचं सोडा आरोग्यविषयक इतर समस्या वाढतात. (Bad Habit) एकंदरच काय तर ही एक अत्यंत वाईट सवय आहे. चहा आणि सिगारेटचे मिश्रण हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरु शकते. कारण चहा- सिगारेट एकत्र प्यायल्याने अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका एकावेळी ३० टक्क्यांनी वाढतो.

कारण, चहामध्ये कॅफीनचे प्रमाण सर्वाधिक असते. (Bad Habit) जे सिगारेटसोबत मिसळल्याने प्राणघातक घटकांची निर्मिती होते. जे आपल्या शरीरात जाऊन कॅन्सर पेशींना उत्तेजित करतात. त्यामुळे चहासोबत सुट्टा मारणे अर्थात सिगारेट फुकणे हे कोणत्याही दृष्टीने कुल असू शकत नाही. उलट ही सवय तुम्ही किती फुल आहात हे दर्शवते.

असा वाढतो कॅन्सरचा धोका

एका रिसर्च रिपोर्टनुसार, गरम चहामुळे अन्ननलिकेच्या पेशींचे नुकसान होते. त्यात जर तुम्ही चहासोबत सिगारेटदेखील ओढत असाल तर अशावेळी आरोग्याचे नुकसान दुप्पट होण्याचा धोका संभवतो. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असल्याचे यात सांगण्यात आले आहे. (Bad Habit) आरोग्य तज्ञ सांगतात की, चहामध्ये कॅफिन असते. जे पोटात एक प्रकारचे अॅसिड तयार करण्यास सक्षम असते. खरंतर कॅफिन हे पचनासाठी उपयुक्त आहे. मात्र, त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याचे नुकसान होते. कारण चहात कॅफिन तर सिगारेटमध्ये निकोटीन असते. हे दोन्ही घटक एकत्र आल्यास आरोग्याचे गंभीर स्वरूपात नुकसान होऊन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने काय त्रास होतो? (Bad Habit)

चहा आणि सिगारेटचे एकत्र सेवन केल्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका, पोटाचा अल्सर, स्मृती भ्रंश, फुफ्फुसाचा कर्करोग, घश्याचा कर्करोग, नपुंसकत्व आणि वंध्यत्व, अन्ननलिकेचा कर्करोग, हात आणि पायांवर व्रण असे त्रास होऊ शकतात. इतकेच नव्हे तर ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकते.