दुर्देवी : बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेसच्या धडकेत बाप- लेकाचा मृ्त्यू

सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्टेशनवरील घटना

खंडाळा | खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील एसआरपीमध्ये असणाऱ्या एकाचा लहान मुलासह रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत एसआरपीमध्ये कार्यरत असणारे शैलेश बोडके आणि त्यांचा एक वर्षांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर शैलेश बोडके (वय – 28) व त्यांचा मुलगा कु. रूद्र (वय- 1) गेले होते. त्यावेळी पुणे-मिरज मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशननजीक बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस रेल्वे (गाडी नंबर- 06506) या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरीतील एसआरपीमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय -२८) आणि त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा कु. रुद्र बोडके यांचा मृत्यु झाला.

अंदोरी शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मुंबई पोलिस दलामध्ये आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आला होता. शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर सपोनि व्ही. आर. पाटोळे, आदीनाथ भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.