दुर्दैवी! यूपीत महिला पोलीस कर्मचारी कोरोनाने दगावली, ४ दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । देशामध्ये कोरोना विषाणूच्या फैलाव झपाट्याने  होत आहे. कोरोनासोबतच्या लढाईत सर्व प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यात सर्वात आघाडीवर असणाऱ्यांपैकी पोलीस कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, या जीवघेण्या कोरोनानाने या पोलीसांवर सुद्धा झडप घातली आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात महिला पोलीस कर्मचारी कोरोना संक्रमित होऊन तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला. दरम्यान, या महिला पोलीस कर्मचाऱ्याने ४ दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.

नोएडा सेक्टर २चे एसीपी रजनीश यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ” माझ्या जवळ शब्द नाहीत, या कोरोना योद्धासाठी. एक लहान मुलगा आणि दुसरे बाळ पाच दिवसांचे आहे. कोरोनाची लढाई लढताना या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे होणे एक दुखद घटना आहे. माझ्याजवळ शब्द नाही, मी निशब्द आहे.! ”

महिला पोलीस कर्मचारी कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर पोलीस ठाण्यात कार्यरत होती. ती गरोदर असल्याने तिने ५ एप्रिलपर्यंत सुट्टी घेतली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तब्बेत अचानक बिघडली. तिला रुग्णालदात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयाने उपचार करण्यात नकार दिला. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता तिचा मृत्यू झाला. महिला पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना तपासणीसाठी सॅम्पल घेतले होते. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment