Badlapur Crime : मुलींवर 15 दिवस अत्याचार? गुप्तांगात 1 इंचपर्यंत जखमा; बदलापूर प्रकरणी धक्कादायक अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेने (Badlapur Crime) संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली असून त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याने नियुक्त केलेल्या दोन सदस्यीय समितीने राज्य सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केल्याची माहिती समोर येत आहे. या प्राथमिक अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मुलींवर १५ दिवसात अनेकदा अत्याचार झाल्याचा संशय या अहवालातून व्यक्त कऱण्यात आला आहे. तसेच सदर अल्पवयीन मुलींच्या गुप्तांगात १ इंचापर्यंत जखमा झाल्याचेही म्हंटल आहे.

अहवालात नेमके काय म्हंटल? Badlapur Crime

गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता आहे.
मुलीच्या गुप्तांगात जवळपास एक इंच पर्यंत इजा झाली असावी.
अक्षय शिंदे हा १ ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाला होता मात्र त्याची कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता त्याला भरती करण्यात आले.
अक्षय शिंदेला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळख पत्राशिवाय सहज प्रवेश होता.
अक्षय शिंदेची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे.
हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.
या प्रकरणी शाळा प्रशासनावर POCSO कायदा का लावला जाऊ नये, असे प्रश्न समितीने उपस्थित केले होते.
शाळा प्रशासन तब्बल ४८ तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.
तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही. पीडित चिमुकलीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला १२ तास लागले. (Badlapur Crime)
शाळेतील स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे. त्याठिकाणी सुरक्षिततेसाठी योग्य सीसीटीव्ही बसवलेले नाहीत.
याप्रकरणी तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारले की ‘मुली दोन तास सायकल चालवतात का?’ यावरून असे दिसून येते की अशा संवेदनशील प्रकरणांना हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान अधिकाऱ्याला नव्हते.