Badlapur School Sexual Assault Case | बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा निर्णय; सर्व शाळांमध्ये करणार मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Badlapur School Sexual Assault Case | आपल्या भारत देश स्वतंत्र होऊन आता 78 वर्षे उलटलेली आहेत. परंतु या भारत देशात अजूनही मुलींना स्वतंत्र मिळालेला आहे का? अजूनही अगदी लहान मुलींपासून ते तरुणींपर्यंत सगळ्याच मुली बिनधास्तपणे सगळीकडे वावरू शकतात का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण कोलकत्तातील अत्याचार प्रकरणानंतर आता बदलापूरमध्ये देखील एक अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहेत. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्यांकडून अत्याचार (Badlapur School Sexual Assault Case) झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ही घटना घडलेली आता आठवडा झाला आहे.

त्यानंतर आता ही घटना समोर आलेली आहे. आणि प्रशासन देखील आरोपीवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचे मत मांडलेले आहे. आणि आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असे देखील सांगितलेले आहे. अगदी आपल्या राज्यातील लहान मुली देखील सुरक्षित नसल्याची भीती या सगळ्या घटनेतून पुढे आलेली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शाळांमध्ये अशी घटना परत कधीही घडू नये आणि लहान मुलींना या शारीरिक अत्याचाराला सामोरे जाऊन लागायला नको. यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील माहिती दिलेली आहे.

बदलापूरमध्ये (Badlapur School Sexual Assault Case) झालेली घटना समोर येताच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तात्काळ बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यासाठी शाळेमध्ये सखी सावित्री समिती कार्यान्वित करण्याची सूचना देखील देण्यात आलेली आहे. प्रशासनाने ही सूचना देऊन जर ही समिती स्थापन झाली नाही, तर ब्लॉक ऑफिसवर कारवाईचे आदेश केले जातील.असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेले आहे.

पॉस्को अंतर्गत ही ईबॉक्स संकल्पना समोर आलेली आहे. त्यासोबत एक तक्रार पेटी देखील ठेवली जाणार आहे. आणि या तक्रारीवर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तसेच याबाबत अधिसूचना देखील काढण्यात येणार आहे. शाळा पातळीवर या सगळ्या गोष्टींचे नियोजन करायला शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेले आहे.

बदलापूरमध्ये ही घटना 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडलेली आहे. 17 ऑगस्टला ही तक्रार दिली होती. परंतु त्यावर अजून कोणतीही कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, संबंधित शिक्षिका आणि इतर इतरांना निलंबित करण्यात येत असल्याचे देखील केसरकर यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेली आहे की, कारवाई केल्यानंतर शाळेची जबाबदारी संपणार नाही. यावेळी शाळेची सीसीटीव्ही देखील बंद होती. सीसीटीव्हीचे जबाबदारी ही पूर्णतः शाळेची असणार आहे. याबद्दल देखील परिपत्रक काढणार आहे. गुन्हेगार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून ही केस एकदम फास्ट ट्रॅकवर चालवली जाणार आहे. यासाठी विशेष वकील देखील नेमला जाणार आहे. आणि ही महिन्याभरातच कोर्टात आणली जाईल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.