बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झाला साखरपुडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि ल दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशाल यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली. विष्णू आणि ज्वाला या वर्षाच्या सुरुवाती पासून रिलेशनशिपमध्ये आहेत .आता ज्वालाच्या वाढदिवसानिमित्त विष्णूने तिला लग्नासाठी प्रपोज करत साखरपुड्याची अंगठी दिली.

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्वाला. आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. सकारात्मक राहुयात आणि आपल्या दोघांच्या उत्तम भविष्यासाठी मिळून प्रयत्न करुयात. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम राहू द्या’, असं म्हणत विष्णूने ज्वालासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/CE0wefNDN_C/?utm_source=ig_web_copy_link

विष्णू हा तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने २००९ मध्ये करिअरला सुरुवात केली. २०११ मध्ये त्याने रजनी नटराजनशी लग्न केलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’