बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालाचा भाजपमध्ये प्रवेश?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : बॅडमिंटन खेळत भारताला अनेक मोठे विजय मिळवून देणारी सायना नेहवाल आज आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करू शकते. सायना नेहवाल आज बुधवारी 29 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना आज भाजपा कार्यालयात घेण्याची तयारी सुरू झाली आहे. असे मानले जाते की सायना राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करेल.

कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट यांनीही सायना नेहवाल यांच्याआधी भाजपमध्ये प्रवेश केला.

सायना नेहवालवर बायोपिक

राजकारणात प्रवेश करणाऱ्या बॅडमिंटनची आयकॉन सायना नेहवालदेखील बायोपिक येत आहे. तिच्या ‘सायना’ या नावाने बनवल्या जाणाऱ्या बायोपिकचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचे म्हणणे आहे की, चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीमध्ये पूर्ण होईल. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत आहे.

या बायोपिकसाठी श्रद्धा कपूरला पहिल्या लीड कॅरेक्टरसाठी घेण्याची चर्चा असली तरी, नंतर परिणीती यांना घेण्यात आले. या चित्रपटात मानव कौल सायनाला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक गोपीचंदची भूमिका साकारत आहेत.