सातारा । सातारा जिल्ह्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पसरणी (ता. वाई,जि. सातारा) येथील बगाड यात्रेस शासनाचे निर्बंध झुगारून साजरी करण्यात आली. वाई तालुक्यातील पसरणी येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. दिनांक 3 व 4 रोजी सालाबाद प्रमाणे यात्रेचा दिवस आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वायचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी पसरणी येथील यात्रा कमिटी व ग्रामस्थांना यात्रा साजरी न करण्याबाबत नोटीस दिलेली होती. तरीही येथील यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या 144 कलम अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून यात्रा साजरी केली.
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वेळोवेळी सुधारित नियम ठरवून दिलेले आहेत. तरीही पसरणी गावातील नागरिकांनी व यात्रा कमिटीने सदरील नियमाचे उल्लंघन केले आहे.
दरम्यान जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत. या रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी बुधवारी कोरोनाबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यात अनेक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसतानाही ही यात्रा साजरी झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’