बगाड यात्रा ः यात्रा भरविल्या प्रकरणी ८३ जणांना न्यायालयाचा दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील बावधन येथे जमावबंदीचे आदेश डावलून यात्रा भरविल्याप्रकरणी प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. बगाड यात्रेत सहभागी असलेल्या लोकांच्यावर गृहमंत्री, पालकमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी धरपकड करून आरोपींना ताब्यात घेतले. वाई पोलिसांनी 83 आरोपींना केले न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश दिले असून अनामत रक्कम न भरल्यास झेलमध्ये ठेवण्याचाही आदेश देण्यात आला आहे.  यात्रा भरवणे गर्दी मारामारी या कलमांसह आपत्ती व्यवस्थापनाचेही केले गुन्हे दाखल 143, 147, 148 आणि आपत्ती व्यवस्थापन कोविड आदी कलमांखाली गुन्हे दाखल वाईच्या पोलिस ठाण्यात दोन ते आडीच हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील प्रकरणी तहसीलदार रणजित भोसले यांनी तक्रार दिली आहे.

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांनी यात्रा साजरी केली होती. संचारबंदी व आपत्कालीन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या लोकांच्यावर शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहीती प्रातांधिकारी संगिता राजापूरे- चाैगूले यांनी दिली.

You might also like