संत तुकारामांची पत्नी रोज त्यांना काठीने मारायची; बागेश्वर बाबा बरळले

0
151
bageshwar baba
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे बागेश्वर बाबा म्हणजेच धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केलं आहे. तुकारामांना त्यांची पत्नी रोज काठीने मारायची अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा बागेश्वर बाबा यांचा निषेध केला आहे.

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले –

संत तुकाराम यांना त्यांची बायको रोज काठीने मारायची. काही लोकांनी त्यांना विचारलं की, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. मला जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. त्यामुळे मारहाण करणारी पत्नी मिळाल्यामुळे देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देत आहे. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर मिळत आहे असं उत्तर तुकारामांनी दिले असं बागेश्वर बाबानी म्हंटल.

दरम्यान, बागेश्वर बाबांच्या या अजब विधानाचा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी तीव्र निषेध केला आहे. बागेश्वर धाम तथा धीरेंद्र शास्त्रीयांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर सबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांनी जगद्गुरू तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.