हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. मुलीने केस दाखल केल्यानंतर, मुलीशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरोपीला पॉस्को (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सस) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने सुरुवातीला 25 वर्षीय व्यक्तीवर एफआयआर दाखल केली होती. नंतर मुलीच्या आईनेच या व्यक्तीच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मुलगी आरोपी व्यक्ती सोबत लग्न करण्याची इच्छा बाळगून आहे. आरोपीला सुद्धा लग्न करण्याचे मान्य असेल तर, न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करावा. अशी विनंती मुलीच्या आईने न्यायालयाला केली होती.
‘अल्पवयीन मुलीचे आणि आरोपी व्यक्तीचे संबंध परस्पर संमतीने होते. आणि आता तो व्यक्ती अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयारी आहे. सोबतच अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाला स्वतःचे नाव देण्यास आणि संगोपन करण्यास तयार आहे. आरोपी पीडित मुलीशी ती 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करायला तयार असेल तर, आरोपीला जेलमध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही. असे न्यायालय जमीन मंजूर करताना म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’