नवी दिल्ली । बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स (Bajaj Allianz General Insurance ) ने मंगळवारी ‘क्रिटी-केअर’ (Criti-Care ) पॉलिसी लॉन्च केली. या क्रिटी-केअर पॉलिसीअंतर्गत गंभीर आजारांचे कव्हर केले जाईल. यासाठी ग्राहक पॉलिसीअंतर्गत 5 किंवा कोणत्याही विभागातील वेटिंग पिरिअड आणि सर्व्हायवल पिरिअड निवडू शकतात. या पॉलिसीमध्ये 43 गंभीर आजारांचा समावेश आहे. यात वेटिंग पिरिअडपासून सर्व्हायवल पिरिअडपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. प्रारंभिक आणि ऍडव्हान्स या दोन्ही टप्प्यावर कव्हरेज उपलब्ध असेल.
कंपनी काय म्हणाली ते जाणून घ्या
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या लाॅन्च मागील हेतू म्हणजे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पॉलिसी स्ट्रक्चरचे स्वातंत्र्य देणे हेच नाही तर संकटाच्या वेळी त्यांना तातडीने आर्थिक पाठबळ मिळण्याची हमी देणे देखील आहे.
लाभ देणारी पॉलिसी
‘क्रिटी-केअर’ ही पॉलिसी केवळ फायदे पुरवण्यावरच केंद्रित आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, या पॉलिसीच्या लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही रोगांचा इलाज करण्यासाठी एकरकमी पैसे कंपनी कडून दिले जातात. त्याअंतर्गत प्रत्येक विभागात विम्याची रक्कम 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत आहे. या पॉलिसीची कमाल विम्याची रक्कम 2 कोटी आहे. या पॉलिसीअंतर्गत 5 विभाग आहेत – कॅन्सर केअर, कार्डियोव्हस्क्युलर केअर, किडनी केअर, न्यूरो केअर, ट्रान्सप्लांट्स केअर आणि सेन्सेटिव्ह ऑर्गन केअर. प्रत्येक विभागात एक स्पेशल लिस्ट आहे. प्रारंभिक अवस्थेतील रोग कॅटेगिरी A मध्ये समाविष्ट आहेत. कॅटेगिरी B ऍडव्हान्स अवस्थेसाठी आहे. जर पॉलिसीधारक A कॅटेगिरी अंतर्गत क्लेम करत असेल तर त्याला त्या विभागाच्या विम्याच्या रकमेपैकी 25% रक्कम मिळेल. कॅटेगिरी B त्याला 100% विम्याची रक्कम मिळेल.
180 दिवसांचे वेटिंग पिरिअड निवडू शकतो
या पॉलिसी अंतर्गत, ग्राहक 7 दिवस किंवा 15 दिवसांच्या सर्व्हायवल पिरिअड बरोबर 120 दिवस किंवा 180 दिवसांचे वेटिंग पिरिअड निवडू शकतो. ही पॉलिसी वैयक्तिक स्तरावर उपलब्ध आहे. जी 1, 2 आणि 3 वर्षे प्रमाणे घेतली जाऊ शकते. या पॉलिसीच्या कव्हरेजमध्ये सामील असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वेगवेगळा प्रीमियम भरावा लागतो.
पॉलिसीधारकाच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश केला जाईल
या पॉलिसीमध्ये किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे. मुले 3 महिन्यांपासून 30 वर्षांपर्यंतची असावीत. त्याचे रिन्यूअलही करावे लागेल. पॉलिसीधारक, त्याची पत्नी किंवा पती, अवलंबुन असलेली मुले, नातवंडे, आई-वडील, सासरे, बहिणी, भाऊ, काका आणि काकू या पॉलिसीच्या अंतर्गत येऊ शकतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा