फसवणूक करू नका ! लॉकडाऊनबाबत पुन्हा नव्याने आदिसूचना जारी करा : फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावा. तसेच फसवणूक करू नका ! सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करावी, अशा मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

राज्य सरकारच्या कडक निर्बंध नियमावलीच्या अंमलबजावणीवेळी मोठा गोंधळ उडाला. विकेंड लॉकडाऊन सांगत राज्य सरकारने आणि तत्सम जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने उघडण्यास बंदी घातली होती. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर उभे राहून सरकारच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला. तसेच, विकेंड लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण 30 एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत, याला आमचा विरोध असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नवीन नियमावली जारी करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. याचाच निषेध म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे. पंढरपूर येथील व्यपाऱ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता, तसेच यासंदर्भात आपण सरकारकडे भूमिका मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानंतर, फडणवीस यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना नियमावलीचा पुनर्विचार करण्याचे सूचवले आहे.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

Leave a Comment