औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादला औद्योगिकनगरीचा मान मिळवून देण्यातील आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या बजाज ऑटो कंपनीचा औरंगाबादेतील प्लान्ट अखेर आज पुन्हा सुरू होत आहे. ‘बजाज’ला हा प्लान्ट सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली असल्याचे समजत आहे. औरंगाबादच्या उद्यागजगताला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
नजीकच्या काळात एक हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर पूर्ण करण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचे समजते. दरम्यान, कंपनीने शुक्रवारपासून महापालिका हद्दीबाहेरील कामगारांना कामावर बोलावल्याची माहिती समोर येत आहेत. ‘बजाज’ सुरू होणे ही औरंगाबादच्या उद्योग जगतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.