Bajaj Pulsar 125 चे नवीन मॉडेल भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज ऑटोने (Bajaj Pulsar 125) नवीन पल्सर 125 ची कार्बन फायबर एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केली आहे, या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 89,254 रुपये आहे. बजाजची ही नवी बाईक निळ्या आणि लाल रंगात लॉंच झाली आहे. बजाजची ही दमदार बाईक थेट Honda SP 125 आणि Hero Glamour 125 शी स्पर्धा करेल.

फीचर्स – 

बजाज पल्सर 125 ही तरुणांमध्ये आकर्षण (Bajaj Pulsar 125) असणारी बाईक आहे. त्यातच यामधील कॉस्मेटिक बदलांमुळे गाडीचा लुक आणखी वाढला आहे. या गाडीची विक्री बजाज पल्सर 125 निऑन एडिशन सोबत होईल, जे स्टाइलिंग आणि डिझाइनच्या बाबतीत सारखेच आहे. बाईकसोबत सिंगल पॉड हेडलॅम्प, मजबूत इंधन टाकी, ब्लॅक एक्झॉस्ट आणि स्प्लिट ग्रॅब रेल देण्यात आले आहेत.

Bajaj Pulsar 125

गाडीचे इंजिन –

बजाज ऑटोने या नवीन बाईक (Bajaj Pulsar 125) मध्ये कोणतेही तांत्रिक बदल केलेले नाहीत. या गाडीला 124.4 cc सिंगल-सिलेंडर फ्युएल – इंजेक्टेड इंजिन दिले गेले आहे जे 8,500 rpm वर 11.64 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 10.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडलेले आहे.

Bajaj Pulsar 125

सस्पेन्शन – (Bajaj Pulsar 125)

गाडीच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या भागात टेलिस्कोपिक शॉक अॅब्सॉर्बर आणि मागील बाजूस ड्युअल शॉक अॅब्सॉर्बर देण्यात आले आहेत. बाईकच्या समोरच्या भागाला 240 mm डिस्क ब्रेक आणि 6 स्पोक अलॉय व्हील्स देखील मिळतात.

Bajaj Pulsar 125

किंमत –

बजाजच्या या दमदार बाईकच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, या गाडीच्या सिंगल सीट व्हर्जनची किंमत 89,254 रुपये आहे. तर स्प्लिट सीट मॉडेलची किंमत 91,642 रुपये आहे.

हे पण वाचा : 

Jawa 42 Bobber : दमदार लूक आणि फीचर्ससह लॉन्च झाली Jawa 42 Bobber; पहा किंमत

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Keeway SR125 : दिवाळीपूर्वी लॉन्च झाली ही दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये