हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील स्पोर्ट्स बाईक्स ह्या नेहमीच तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. आजच्या सुपर फास्ट जमान्यात तरुणाईच्या मनाचा ठाव घेत Bajaj ह्या जगप्रसिद्ध वाहन उद्पादक कंपनीने आजच्या युगात वेगाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या तरुणांसाठी “Bajaj Pulsar N160” हि स्पोर्ट्स बाईक बाजारात आणली आहे .ह्या स्पोर्ट्स बाईकची आकर्षक रचना आणि तिचा वेग पाहता तरुणांमध्ये ही बाईक खूप लोकप्रिय ठरत आहे. जर तुम्ही सुद्धा हि बाईक घेण्यास इच्छुक आहात तर आमच्या ह्या लेखात आम्ही Bajaj Pulsar N160 चे इंजिन, फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तरपणे माहिती देत आहोत.
इंजिन –
बजाज पल्सरच्या नवीन मॉडेलमध्ये 164.82 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन मिळतेय. हे इंजिन 5-गियर बॉक्सशी जोडलेलं असून ते 6750 Rpm वर 14.65 Nm टॉर्क आणि 8750 Rpm वर 16 PS पर्यंत पॉवर जनरेट करू शकत. Bajaj Pulsar N160 ला 14 लीटरची इंधन टाकी मिळेल. या दमदार बाईकला 55 ते 60 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळत आहे. त्यामुळे एकदा टाकी फुल केल्यानंतर तुम्ही आरामात 800 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता.
फीचर्स –
गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये तुम्हला अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने बाईकचे ट्विन डीआरएलसह सिंगल-पॉड प्रोजेक्टर स्टाइल हेडलाइट तसेच कायम ठेवले आहे. तसेच यामध्ये तुम्हाला इंजिन काउल आणि स्प्लिट-स्टाईल सीट , बॉडी-कलर हेडलॅम्प काउल, कलर-मॅचिंग फ्रंट फेंडर, यांसारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही टायर्सवर बसवण्यात आलेल्या डिस्क ब्रेकला (dual channel ABS ) डबल चॅनेल लावण्यात आल्याने मजबूत सपोर्ट मिळत आहे. सध्या बाजारात सिंगल चॅनल ABS व्हेरिएंट आणि ड्युअल चॅनेल ABS अश्या दोन प्रकारच्या व्हेरिएंटमध्य उपलब्ध असलेल्या ह्या बाईक्समध्ये तरुणाईची असलेली क्रेझ लक्षात घेऊन सध्या प्रचलित असलेल्या सर्वच सुपर फास्ट बाईक्स मधील फिचर्स चा समावेश ह्या बाईकमध्ये करण्यात आला आहे..
किंमत किती?
Bajaj Pulsar N160 च्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या बाईकच्या सिंगल चॅनल ABS व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत हि 1.23 लाख रुपये आहे तर ड्युअल चॅनेल ABS च्या व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत हि 1.28 लाखांपर्यंत जाऊ शकते.