Bajaj Pulsar नव्या अवतारात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar NS160 and NS200 Launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध टू – व्हीलर कंपनी बजाजने आपल्या 2 बाईक NS160 आणि NS200 नव्या अवतारात लॉन्च केल्या आहेत. दोन्ही अपडेटेड गाड्यांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यानुसार, नवीन 2023 बजाज पल्सर NS160 आता रु. 1,34,675 रुपयांना उपलब्ध असेल. यागाडीच्या किमतीत 9,651 रुपयांची वाढ झाली आहे. तर 2023 Bajaj Pulsar NS200 आता 1,47,347 रुपयांना खरेदी करता येईल. या बाईकची किंमत 6,681 रुपयांनी वाढली आहे. चला जाणून घेऊया दोन्ही बाईकची खास वैशिष्ट्ये…

या दोन्ही गाड्यांमध्ये हलकी चाके मिळतात त्यामुळे बजाज पल्सर NS200 चे वजन 159.5 वरून 158 kg पर्यंत कमी झाले आहे. मात्र दुसरीकडे NS160 ला हलकी चाके असूनही पूर्वीपेक्षा मोठे टायर असलयाने या गाडीचे वजन १ किलोग्रॅमने वाढलेलं आहे. 2023 बजाज पल्सर NS160 आणि NS200 दोन्ही गाड्या 33mm USD (अपसाइड डाउन फोर्क) फ्रंट फॉर्क्ससह येतात. हे पेटल डिस्क ब्रेक्स आणि बायब्रे कॅलिपर्सऐवजी वर्तुळाकार डिस्क आणि ग्रिमेका कॅलिपरसह येते. दोन्ही बाईक मध्ये फ्रंट डिस्कचा आकार 260 मिमी वरून 300 मिमी पर्यंत वाढविला गेला आहे

दोन्ही गाड्यांच्या इंजिनबाबत सांगायच झाल्यास, 2023 Bajaj Pulsar NS160 मध्ये 160.3cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 17.2PS ची पॉवर आणि 14.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडलेले आहे. नवीन इंजिन सेटअप BS6 फेज 2 उत्सर्जन मानदंडांनुसार तयार करण्यात आलं आहे. म्हणजेच ही बाईक E20 (इथानॉल मिश्रित) इंधनावरही चालेल. दुसरीकडे, बजाज पल्सर NS200 बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 199cc लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 24.5PS ची कमाल पॉवर आणि 18.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.