लवकरच येतेय CNG वर चालणारी Bike; इंधनाचा खर्च येणार निम्म्यावर

Bajaj CNG Bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दुचाकी मार्केटमध्ये मोठा वाटा ठेवणाऱ्या बजाज मोटर्स (Bajaj Motors) नेहमीच भारतीय बाजारात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात . तसाच अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न बजाज मोटर्स करत आहे. बजाज मोटर्स आता भारतीय बाजारात लवकरच CNG वर आधारित दुचाकी लॉंच करणार असल्याचे वक्तव्य बजाज मोटर्सचे व्यवस्थापिय संचालक राजीव बजाज यांनी केले आहे.

राजीव बजाज एका मुलाखती दरम्यान बोलत असताना त्यांनी बजाज CNG वर आधारित नवीन दुचाकी बनव्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत असे सांगितले. सर्व पातळीवर ही Bike खरी उतरल्यानंतर ही बजाज मोटर्सच्या माध्यमातून भारतीय बाजारात दाखल केली जाईल. दुचाकी बाजारात आल्यानंतर CNG वर आधारित दुचाकी एक क्रांतिकारी पाऊल असेल. त्यामुळे इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकेल . तसेच पर्यावरणासाठी धोकादायक असलेल्या इंधन जसे की, डिझेल व पेट्रोल चा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल .

बजाज मोटर्स जर CNG वर आधारित मोटरसायकल बनवत असेल तर त्यांना पेट्रोल साठी वापरली जाणारी टाकी CNG साठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरमध्ये बदलावी लागेल. आणि हे करणे बजाज मोटर्ससाठी सर्वात मोठे आव्हान असेल. कारण अपघातात सिलेंडर फुटून गॅस गळती होण्याचे प्रकार होऊ शकतात व त्यातून मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो . परंतु ह्या अडचणीवर जर बजाज मोटर्स ठोस उपाय शोधू शकले तर CNG वर आधारित ही दुचाकी क्रांतिकारी ठरेल . सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट जास्त असले तरी CNG वर आधारित दुचाकी बाजारात इलेक्ट्रिक मार्केटला जोरदार टक्कर देऊ शकतील. यामध्ये बजाजने 100-110cc ची बाईक सीएनजीवर चालणारी बाईक बनवली तर ती कमालीची कार्यक्षम असेल हे नाकारता येणार नाही.

पल्सर बाईक मध्ये मिळणार नवीन उपग्रेड :

दरम्यान, बजाज ऑटो लवकरच बजाज पल्सर ही ६ नवीन अपग्रेड मॉडेल्समध्ये लॉन्च करणार आहे. बजाज ऑटोकडे सध्या बजाज पल्सर रेंजमध्ये 250cc वाली बाईक आहे. यासोबतच 100 सीसी आणि 125cc सेगमेंट मध्ये सात बाईक आहेत. कंपनीकडून TRIUMPH आणि CHETAK या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रोडक्शनचे काम सुद्धा सुरू आहे. TRIUMPH या बाईकचे मंथली प्रोडक्शन ८ हजारांपासून 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी कंपनी करत आहे. आणि चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरचे मंथली प्रोडक्शन या फेस्टिव सीझनमध्ये 10 हजार इतकं असेल.