सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
साताऱ्यातील लादी पाव बेकरी असोसिएशनच्या वतीने तीन दिवस बेकरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 10 ते 12 फेब्रुवारी असे तीन दिवस बेकरी मधून लादी पाव चे उत्पादन केले जाणार नाही. उत्पादन करण्यात येणाऱ्या लादी पावाला भाव वाढवून मिळावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वच बेकरी लादी पाव चे उत्पादन करणार नसल्याने अनेक छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम होणारं आहे. बेकरी असोसिएशनच्या वतीने केल्या गेलेल्या बंदच्या विरोधात गेल्यास बेकरी मालकांवर पुढील काळात कडक कारवाई होईल, असाही इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.
बेकरीतून पाव उत्पादन बंद ठेवल्याने मोठी आर्थिक उलाढाल ठप्प राहणार आहे. सध्या 40 रूपयांना 24 पाव दिले जात असून आता 50 रूपयाला दिले जाणार आहेत. संघटनेच्या विरोधात जावून जे पाव विकतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.