शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

0
61
Shiv Sena
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचे नाशिकमधील विधानसभा प्रमुख बाळा कोकणे यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. यामध्ये कोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील एम. जी. रोडववरून सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोकणे आपल्या दुचाकीवरून जात होते. एम. जी. रोडवरील यशवंत व्यायामशाळेसमोरून जात असताना, त्यांच्यावर पाठीमागून अज्ञातांनी अचानक हल्ला केला. त्यांनी कोकनेंच्या डोक्यावर हत्याराने वार केल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर जखमी कोकणे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कोकणे यांची भेट घेत त्यांच्याकडून हल्ल्याच्या घटनेची माहिती घेतली असून हल्लेखोरांचा शोध घेतिला जात आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की दुसऱ्या अन्य कारणावरून याची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here