हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. यावरच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
या संदर्भात बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही,”थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” अस बाळा नांदगावकर म्हणाले.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.कापणीला आलेली पिके बघता-बघता भुईसपाट झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळं राज्यातील शेतकरी हादरून गेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे करोना लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शक्यतो घरातूनच राज्याचा गाडा हाकत आहे. याबद्दल आतापर्यंत त्यांच्यावर अनेकदा टीका झाली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’