प्रा. बालाजी गाढे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड प्रतिनिधी | नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य पदावर कार्यरत असलेले प्रा.बालाजी गाढे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे, त्यानिमित्त त्यांचे सर्व स्तरातून व पक्षप्रेमींतून अभिनंदन होत आहे.

राज्य पातळीवर युवक काँग्रेसच्या निवडीची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष मा. अशोकराव चव्हाण साहेब व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा.बालाजी गाढे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. अगदी लहान वयापासून चळवळ, संघटना व सामाजिक उपक्रमांमधून सहभाग असलेले व वैचारिक व अभ्यासू व्यक्ती म्हणून सर्वपरिचित असलेले प्रा. बालाजी गाढे यांची एक सुप्रसिद्ध वक्ता अशी जनमानसात ओळख आहे.

यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे व सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य पदी कार्यरत असून पक्षाने वेळोवेळी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रा, आंदोलने, संप, निदर्शने यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सध्या पक्ष्याच्या कार्यकारणीत धोरणात्मक बदल करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने ही जबाबदारी प्रा.गाढे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Leave a Comment