हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या बालाकोट येथील लष्करी तळ भारताच्या हवाई दलाने उध्वस्त केले होते. एअर स्ट्राईक असं नाव पडलेल्या या घटनेला आज एक वर्षं पूर्ण झालं.
बालाकोट एअरस्ट्राइकला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वत: हवाई दल प्रमुख मिग-21 लढाऊ विमान उड्डाण करतील. एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदोरिया बुधवारी काश्मीरमध्ये आहेत. 26 फेब्रुवारी 2019 लाच भारतीय वायुसेनेच्या मिराज लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ नष्ट केला होता. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनीही आपल्या मिग-21 विमानात श्रीनगरहून उड्डाण करून पाकिस्तान हवाई दलाच्या एफ-16 लढाऊ विमानाला पडण्याचा पराक्रम केला होता.
गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे देश हादरला नाही. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेला दहशतवादी हा जम्मू काश्मीरच्या इतिहातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पसरली होती. याचसोबत काश्मीरमधील पाक समर्थीत दहशतवादाची जगातील सर्वच देशांनी कडक शब्दांत निंदा केली होती. या हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई केली होती.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.